करूर वैश्य बॅंकेद्वारे ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या त्रैमासिक/नऊ महिन्यांचा कालावाधीसाठीचा आर्थिक निकालांची घोषणा

करूर वैश्य बॅंकेचे, व्यवस्थापकिय अध्यक्ष आणि सीईओ, श्री. रमेश बाबू बी

ठळक वैशिष्ठ्ये:

एकूण व्यवसाय वार्षिक तुलनेनुसार १४.९३% ने वर गेला आणि या त्रैमासिकाकरिता ३.३२% एवढा होता.

वार्षिक तुलनेनुसार ठेवी १५.७५% ने वाढल्या आणि या त्रैमासिकाकरिता ३.४६% एवढ्या होत्या.

कर्जाची रक्कम वार्षिक तुलनेनुसार १३.९६% ने वर गेली तर या त्रैमासिकाकरिता ती ३.१६% होती.

CASA वार्षिक तुलनेनुसार ४.२८% एवढा वाढला तर, CASA गुणोत्तर २८.४१% होते.

PPOP वार्षिक तुलनेनुसार २१.१५% ने वर गेला.

NIM ४.०९% ला राहिला, वार्षिक तुलनेनुसार ११ bps ने खाली आला.

वार्षिक तुलनेनुसार इतर मिळकत ही २९% एवढी सुधारली.

याकालावधीकरिता कॉस्ट टू इन्कम गुणोत्तर हे 47.06% होते.

ROA या त्रैमासिकाकरिता १.७४% होता.

ROE या त्रैमासिकाकरिता १७.४२% होता.

GNPA हा ०.८३%, NNPA हा ०.२०%.

कॅपिटल ॲडिक्वसी रेशो (CRAR) हा १५.९१%  होता ज्यात CET १ गुणोत्तर हे १५.०३% होते.

करूर वैश्य बॅंकेचे, व्यवस्थापकिय अध्यक्ष आणि सीईओ असलेले, श्री. रमेश बाबू बी म्हणाले,

“आम्ही आणखीन एक भक्कम असे त्रैमासिक दिलेले असून, याकरिता तीन महत्वाचे मार्गदर्शिय मुद्दे होते: विकास, फ़ायदा आणि मालमत्तेची गुणवत्ता. बॅंकेची प्रगती ही आमचे मार्गदर्शन, सातत्य आणि एकत्रित विकास दर्शविणारी आहे.

आम्ही RAM चा (रिटेल, ॲग्रीकल्चर आणि एमएसएमई) वाढता आणि उत्तम असा आलेख राखला असून, ही भरभक्कम अशी सुरवात आम्ही नवीन वर्षाचा आगमनालाच केली आहे. हेच सातत्य आम्ही राखू शकू याचा मला विश्वास आहे.

आमचा एकूण व्यवसाय हा ₹१,८१,९९३ कोटीचा पुढे गेला आहे. सगळ्या व्यावसायिक विभागांकडून सहाय्य मिळत  एकूण नफ़ा हा गेल्या नऊ महिन्यांमध्ये ₹१,४२८ कोटींचा झाला आहे.

करूर वैश्य बॅंकेने ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या त्रैमासिक/नऊ महिन्यांचे आपले आर्थिक निकाल २० जानेवारी २०२५ रोजी जाहीर केले. बॅंकेद्वारे आपली उत्तम अशी प्रगती व्यावसायिक विकास, नफ़ा आणि उत्तम गुणवत्ता असलेल्या मालमत्तेचा माध्यमाने सातत्याने होताना दिसून येते आहे.

ताळेबंदी:

डिसेंबर ३१,२०२४ नुसार ताळेबंदीचा आकार हा ₹ १,१६,३७३ कोटी होता जो डिसेंबर ३१, २०२३ रोजी ₹ १,०२,८६८ कोटी होता, तुलनात्मक विचार केल्यास , विकास हा १३.१३% झाला.

३१ डिसेंबर २०२४ रोजी एकूण व्यवसाय ₹ १,८१,९९३ कोटी, ज्याची वार्षिक तुलना केल्यास वाढ ही १४.९३% झाली म्हणजेच ₹ २३,६३६ कोटी ने जास्ती ड्जो ३१.१२.२०२३ रोजी ₹ १,५८,३५७ कोटी एवढा होता.

३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ठेवींची रक्कम ही ₹ ९९,१५५ कोटींची आहे, ज्याची वार्षिक तुलना केल्यास वाढ १५.७५% ची दिसून येते, म्हणजेच ₹ १३,४९० कोटींची, ३१.१२.२०२३ पर्यंत ही रक्कम ₹ ८५,६६५ कोटींची होती.

३१ डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण ॲडव्हान्सेसची रक्कम ही ₹ ८२,८३८ कोटी एवढी आहे, ज्याची वार्षिक तुलना केल्यास १३.९६% ने वाढ झाल्याचे लक्षात येते म्हणेच ₹ १०,१४६ कोटींची, जी ३१.१२.२०२३ पर्यंत ₹ ७२,६९२ कोटी एवढी होती.

आर्थिक प्रगती- ९ महिने आर्थिक वर्ष २०२५

नऊ महिन्यातील निव्वळ नफ़ा हा २४.२८% ने वाढला आसून तो ₹ १,४२८ कोटी एवढा झाला आहे, जो मागील वर्षातील याच महिन्यांमध्ये ₹ १,१४९ एवढा होता.

नऊ महिन्यांसाठीचा PPOP हा २१.१५%  एवढा वाढला असून तो ₹ २,३७७ कोटी एवढा नोंदविला गेला आहे जो मागील वर्षाचा याच महिन्याच्या वेळी ₹ १,९६२ कोटी एवढा होता.

व्याजाची निव्वळ मिळकत ही १२.४०% ने वाढली आहे जी आता ₹ ३,१६३ कोटी एवढी आहे आणि तीच रक्कम मागील वर्षाचा याच महिन्यामध्ये ₹ २,८१४ कोटी एवढी होती.

व्याजाचा निव्वळ फ़रक हा ४.०९% कमी झाला असून तो ११ bps ने खाली आला आहे जो मागील वर्षाचा याच महिन्यामध्ये ४.२०% एवढा नोंदविला गेला होता.

ठेवींची किंमत ही ४४bps ने वाढली आहे आणि ती ५.५७% ने वाढली, मागील वर्षांचा नऊ महिन्यांशी तुलना करायची झाली तर ती ५.१३% एवढी होती.

ॲडव्हान्सेसवरील मिळकत ही १०.१२% ने वाढली म्हणजेच २४ bps ने आणि तुलनात्मक विचार केला तर मागील वर्षांचा नऊ महिन्यांमध्ये ही ९.८८% एवढी होती.

कमिशन आणि शुल्कांवर आधारीत मिळकत ही वार्षिक तुलनात्मक पद्धतीने बघितली तर १२.९२% ने सुधारली जी मागील वर्षाचा नऊ महिन्यांमध्ये असलेल्या  ₹ ६२७ कोटींपासून ₹ ७०८ कोटींपर्यंत गेल्याचे लक्षात येते.

मागील नऊ महिन्यांचा कार्यकारी खर्च हा ₹ २,११४ कोटी एवढा होता जो मागील वर्षाचा नऊ महिन्यांमध्ये ₹ १,८८२ कोटी एवढा नोंदविला गेला होता.

कॉस्ट टू इन्कम रेशो (किंमत आणि मिळकतीमधील गुणोत्तर) ४७.०६% एवढे होते (मागील वर्षाचा नऊ महिन्यांचा कालावधी मध्ये ते ४८.९५% एवढे नोंदविले गेले)

आर्थिक प्रगती- त्रैमासिक ३ आर्थिक वर्ष २०२५ वि. त्रैमासिक ३ आर्थिक वर्ष २०२४:

त्रैमासिकातील निव्वळ नफ़ा हा २०.३९% ने वाढला आसून तो ₹ ४९६ कोटी एवढा झाला आहे, जो मागील वर्षातील याच महिन्यांमध्ये  ₹ ४१२ कोटी एवढा होता.

PPOP हा या त्रैमासिकाकरिता २०.५६%  एवढा वाढला असून तो ₹ ८१५ कोटी एवढा नोंदविला गेला आहे जो मागील वर्षाचा याच महिन्यांच्या वेळी ₹ ६७६  कोटी एवढा होता.

व्याजाची निव्वळ मिळकत ही ७.७९% ने वाढली आहे जी आता ₹ १,०७९ कोटी एवढी आहे आणि तीच रक्कम मागील वर्षाचा याच महिन्यांमध्ये ₹ १००१ कोटी एवढी होती.

व्याजाचा निव्वळ फ़रक हा ४.०३% असून तो मागील वर्षाचा याच महिन्यांमध्ये ४.३२% एवढा नोंदविला गेला होता.

ठेवींची किंमत ही ४१ bps ने वाढली असून ती ५.६६% ने वाढली आहे मागील वर्षाचा याच कालावधीमध्ये ती ५.२५% एवढी होती.

ॲडव्हान्सेसवरील मिळकत ही १०.१६% राहिली ज्याचा तुलनात्मक विचार केला तर मागील वर्षाचा याच कालावधीमध्ये देखील ती १०.१६% एवढीच होती.

कमिशन आणि शुल्कांवर आधारीत मिळकत ही वार्षिक तुलनात्मक पद्धतीने बघितली तर ३.५४% ने सुधारली जी ₹ २३४ कोटी झाली व  मागील वर्षाचा याच काळामध्ये ती ₹२२६ कोटी एवढी होती.

त्रैमासिकाचा कार्यकारी खर्च हा ₹ ७३१ कोटी एवढा होता जो मागील वर्षाचा याच काळाकरिता ₹ ६८३ कोटी एवढा नोंदविला गेला होता.

कॉस्ट टू इन्कम रेशो (किंमत आणि मिळकतीमधील गुणोत्तर) ४७.२७% एवढे होते (मागील वर्षात याच कालावधी मध्ये ते ५०.२७%  एवढे नोंदविले गेले)

भांडवलाची पर्याप्तता:

कॅपिटल ॲडिक्वसी रेशो(CRAR) हा बेसल  III मार्गदर्शिकांनुसार ३१ डिसेंबर, २०२४ रोजी १५.९१% एवढा होता(३१ डिसेंबर, २०२३ रोजी १५.३९%), नियामकांनुसार त्याची टियर १ करता आवश्यकता ही ११.५०% एवढी आहे व ३१ डिसेंबर २०२४ रोजी तो ३१ डिसेंबर २०२३चा १३.८७% चा तुलनेत १५.०३% होता. धोका पत्करून मिळविलेली मालमत्ता ही ३१, डिसेंबर २०२४ पर्यंत ₹ ६४,७५६ कोटी एवढी होती. (३१ डिसेंबर २०२३ रोजी ती ₹ ५९,५३१ एवढी होती)  

मालमत्तेची गुणवत्ता:

ग्रॉस नॉन पर्फ़ॉर्मिंग असेट(GNPA) मध्ये ७५ bps ने सुधारणा झाली असून ती आता ०.८३% (₹ ६९१ कोटी) एवढी ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत आहे जी १.५८% (₹१,१५२ कोटी) ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत होती.

नेट नॉन पर्फ़ॉर्मिंग असेट (NNPA)ही १% पेक्षा कमी आहे जी ३१ डिसेंबर, २०२४ चा निव्वळ ॲडव्हान्सेस नुसार ०.२०% एवढी आहे (₹ १६७ कोटी), जी ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत ०.४२% (₹३०५ कोटी) एवढी होती.

प्रोविजन कव्हरेज रेशो (PCR) हा ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ९६.८७% एवढा आहे जो ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ९४.८१% एवढा होता.

नेटवर्क: 

३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत बॅंकेचे जाळे हे ८६६ शाखानी सर्वत्र पसरलेले असून १ डिजिट्ल बॅंक युनिट आणि २,१९७ एटीएम/कॅश रिसायकल मशीन्स ही ८३१ शाखांनुसार उपलब्ध आहे ज्याची संख्या ३१ डिसेंबर २०२३ मध्ये २,२५१ एवढी होती. आमचा ५५% शाखा या निम-शहरी आणि ग्रामीण भागात आहे, याशिवाय आमचे ३७८ व्यावसायिक वार्ताहर देखील आहेत.


Comments