मिसेस प्रियंका देवरुखकर “मिसेस मुंबई – 2024” ची विजेती ठरली
मुंबई (प्रतिनिधी):मुंबईतील महिलांच्या आत्मविश्वास, कला, आणि प्रतिभेला सन्मान देणारी तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ‘मिसेस मुंबई टॅलेंट शो’ स्पर्धा नुकतीच गोरेगाव, मुंबई येथे रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेत मिसेस प्रियंका अमेय देवरुखकर ही “मिसेस मुंबई – २०२४ ची प्रथम विजेती ठरली. मिसेस बीना मेहता ही दुसरी विजेती तर मिसेस जिगना गाला ही तिसरी विजेती ठरली. याप्रसंगी फॅशन, मॉडेलिंग तसेच सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ग्रेस ब्युटी सलोन आयोजित “मिसेस मुंबई टॅलेंट शो” चे आयोजन डॉ. स्मिता नगरकर व गौरी कावले यांनी केले होते. ज्या महिलांना लहानपणापासून जी स्वप्न असतात, ज्यांना मॉडलिंगची हौस असते, क्राऊन हवा असतो, प्रत्येकीला वाटते की हे आपलं स्वप्न पूर्ण व्हावं, आपलं टॅलेंट लोकांसमोर यावं, अशा खास महिलांसाठी या स्पर्धेचं आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा उद्देश हाच की त्यांना रंगमंच भेटावा, त्यात वयाचे व सुंदरतेचे बंधन नाही, फक्त तुमचा कॉन्फिडन्स आणि टॅलेंट यामध्ये बघितला जाईल हा एकच उद्देश ठेवून हा टॅलेंट शो चे आयोजन डॉ. स्मिता नगरकर व गौरी कावले यांनी केले होते. या स्पर्धेत ३० ते ६५ वयोगटातील २५ महिलांनी भाग घेतला होता. त्यांचे प्रशिक्षण फॅशन व मॉडेलिंग क्षेत्रातील मान्यवरांकडून करून घेण्यात आले होते.
“मिसेस मुंबई – २०२४” या स्पर्धेत मिसेस सुवर्णा मंगेश जाधव (चार्मिंग दिवा), मिसेस स्मिता मखवाना (क्वीन ऑफ ब्युटी), मिसेस अनुश्री मारू (फॅब्यूलस ब्युटी), मिसेस वृशाली प्रकाश आभाळे (रॉयल ब्युटी), मिसेस मृणाल मंगेश (टाइमलेस ब्युटी), मिसेस मेघा (ग्रेसफूल क्वीन), मिसेस सीमा गिडकर (ब्यूटीफूल स्माइल), मिसेस इशिका इजिनियर (ब्यूटीफूल आइज), मिसेस वंदना प्रवीण गांगूर्डे (स्टार ऑफ बॉडी पॉजिटिव), मिसेस प्रियंका खांडेलवाल (रेडीयंट स्कीन), मिसेस ज्योती प्रशांत शार्दुल (स्टार ऑफ एलिगन्स), मिसेस तिलोत्तमा इंगळे (ग्लॅमर लुक), मिसेस आरती विशाल घाग (लवली हेयर), मिसेस विद्या क्षीरसागर (एम्प्रेस्स ऑफ ब्युटी) हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे परीक्षक हेअर आर्टिस्ट हरीश भाटिया, मेकअप आर्टिस्ट अमोल जोशी, क्लासिकल डान्सर विद्या श्रीराम हे होते. लवकरच मिसेस मुंबई सीजन ३ चे आयोजन करण्यात येणार असून विविध क्षेत्रातील तसेच वयोगटातील महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक डॉ. स्मिता नगरकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment