बहिणींना सक्षम बनवणारा ‘दादा’ -अजित पवारांचे अर्थसंकल्पात महिलांना फायदा -शहरी, ग्रामीण भागात महिलांना होणार फायदा
मुंबई, प्रतिनिधी (पीएनटी): राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी आपला विक्रमी अर्थसंकल्प सादर करतांना महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणा पाहता हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, मुलींना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्वाचे पाऊल ठरेल.
अर्थसंकल्पात महिलांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना महिन्याला १ हजार ५०० रूपये मिळणार आहेत.
राज्यातील जवळपास २ कोटी ५० लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.
शेजारच्या मध्य प्रदेश व कर्नाटकात अशा स्वरूपाच्या योजना चालू असून त्याचा सकारात्मक परिणाम महिलांच्या आयुष्यात दिसून येत आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळी देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला सक्षमीकरणास बळ देण्याची गरज वेळोवेळी बोलून दाखवली होती.
बजेटमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसत आहे.
अजितदादांनी केलेली दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे मुलींना मोफत उच्च शिक्षण, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, मेडिकल, अॅग्रीकल्चरच्या पदवी, पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या शैक्षणिक व परिक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय क्रांतिकारी असाच आहे.
या निर्णयामुळे मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढणार असून जास्त जास्त मुली व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळतिल.
या योजनेचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील मुलींना होणार आहे. ज्याचे पैशाअभावी शिक्षण रखडते.
राज्यातील जवळपास २ लाख ५ हजार मुलींना पदवी पर्यंत शिक्षण मोफत मिळणार आहे. गरीब, निम्न मध्यम वर्गातील मुलांसाठी अजितदादांनी जणू उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडले आहेत.
एकंदरीत सर्व घोषणा पाहता हा अर्थसंकल्प महिला केंद्रीत अर्थसंकल्प असल्याचे दिसून येते. महिलांसाठींच्या योजनांना भरघोस निधी देत अजितदादा पवार यांनी आपण राज्यातील महिलांचे खरेखुरे दादा असल्याचे दाखवून दिल्याचे दिसते.
- महिला, युवतींसाठी भरभक्कम तरतूदी
याबरोबरच अर्थसंकल्पात महिलांना वर्षात ३ मोफत गॅस सिलिंडर, १० हजार महिलांना ई रिक्षा देणारी पिंक ई रिक्षा योजना, युवती पदवी, पदविकाधारकांना सहा महिने प्रति महिना 10 हजार रूपये मानधन देणारी घोषणा
अजितदादा यांनी अर्थसंकल्पात केली आहे.
- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संकल्प
बचत गटाच्या फिरत्या निधीमध्ये १५ हजारावरून ३० हजारांची वाढ हे निर्णय महिलांना आर्थिक बळ देणारे आहेत.
त्याच प्रमाणे गाय दुधाला प्रतिलिटर ५ रूपये अनुदान देवून अजितदादांनी ग्रामीण भागात शेतात राबणाऱ्या दुग्धव्यवसायात असणाऱ्या आया बहिणींना मोठा दिलासा दिला आहे.
Comments
Post a Comment